शेअर बाजार म्हणजे काय ?
आज आपण बोलणार आहोत शेअर बाजार विषयी , शेअर बाजार म्हणजे काय ? त्यात पैसे कसे गुंतवावे?
कंपनी ची निवड कशी करावी? या सर्व प्रश्नांची आपण उत्तरे शोधणार आहोत.
या जगात प्रत्येकासाठी पैसे महत्वाचा आहे . पैसे असतील तरच आपल्या सर्व गरज पूर्ण होतात, आपल्याला समाजात मान सन्मान मिळतो. पैसे कमावण्यासाठी आपण नौकरी करतो काही जण व्यवसाय करतात व त्यातून आपण पैसे मिळवण्याचा प्रयत्न करतो व हा पैसा आपण वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवतो. जसे कि सोने, जमीन, बँक एफडी, शेअर बाजार. तर यात शेअर बाजार हे असे एक ठिकाण आहे कि ज्यामध्ये आपण पैसे गुंतवून एक मोठी रक्कम आपण उभी करू शकतो.
शेअर बाजार मध्ये जेव्हा आपण एखादा शेअर घेतो तेव्हा आपण त्या कंपनी मध्ये लहानसा मालकी हक्क मिळवीत असतो, एखाद्या कंपनिस जेव्हा आपल्या व्यवसायाचा विस्तार करायाचा असतो तेव्हा कंपनीकडे दोन मार्ग असतात १. बँककडे जाऊन कर्ज काढणे २ कंपनीचे शेअर्स विकणे व व्यवसाय विस्तारासाठी रक्कम उभी करणे. बँकेतुन कर्ज घेतल्यास त्यावर व्याज कंपनीस द्यावे लागते, म्हणून कंपनी आपला ipo शेअर बाजार मध्ये आणून त्यातून रक्कम उभी करते. ज्याद्वारे लोक शेअर्स विकत घेतात व त्या कंपनी मध्ये स्वतः चा मालकी हक्क घेतात. जेव्हा कंपनीस फायदा होईल तेव्हा आपल्या शेअर्स ची किंमत वाढणार व कंपनीस नुकसान झाले तर आपल्या शेअर्स ची किंमत कमी होणार.
शेअर बाजार चे नियंत्रण हि सेबी या संस्थे मार्फत होते. शेअर बाजार चे व्यवहार हे nse व bse या ठिकाणी होतात. bse म्हणजे bombay stock exchange हा देशातील सर्वात जुना रोखे बाजार आहे. bse ची स्थापन १९७५ साली होती. bse मध्ये जवळपास ६००० पेक्षा जास्त कंपन्या नोंदणीकृत आहे. हे आशिया खंडातील सर्वात मोठे व सर्वात जुने रोखे बाजार आहे. तर nse हे देशातील दुसरे मोठे रोखे बाजार आहे nse मध्ये देशातील सर्वात मोठ्या ५० कंपनीचा मिळून index आहे . तर bse मध्ये देशातील ३० सर्वात मोठ्या कंपनीचा मिळून index आहे.
आपल्याला जर शेअर्स विकत घ्यायचे असतील तर आपल्याला sebi मान्यता प्राप्त एखाद्या ब्रोकर कडे डिमॅट अकाउंट उघडावे लागेल. ज्यामध्ये आपण विकत घेतलेले शेअर हे इलेक्ट्रॉनिक्स स्वरूपात साठवले जातात, आपण मान्यताप्राप्त ब्रोकर कडे आपले डिमॅट अकाऊं उघडू शकतो जसे कि zerodha, hdfc securities, upstox, angel broking इत्यादी. डिमॅट अकाउंट उघडण्याची प्रक्रिया हि खूप सोपी असून आपण काही वेळेतच स्वतःचे डिमॅट अकाउंट उघडू शकतो. व त्या माद्यमातून आपण शेअर्स ची खरेदी व विक्री करू शकतो.
कंपनी ची निवड कशी करायची?
एखाद्या कंपनीचे शेअर्स विकत घेण्यापूर्वी त्या कंपनी चा अभ्यास करणे फार अवश्य आहे. ज्यामध्ये त्या कंपनीला होणार नफा, तोटा, कंपनीकडे शिल्लक असणारी रक्कम, कंपनीच्या भविष्यातील योजना इत्यादी. कंपनी निवडण्या पूर्वी त्या कंपनी चा बिसिनेस आपण समजून घेणे फार आवश्यक आहे.
कंपनी ची निवड व त्यात गुंतवणूक करण्या पूर्वी आपण पुढील गोष्टी लक्षात ठेवणे फार आवश्यक आहे.
१. त्याच कंपनीची निवड करावी जिचा बिसिनेस स्वतःला समजतो.
२ शेअर्स बाजार मध्ये गुंतवणूक करताना आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणे.
३ शेअर्स बाजार चे मूलभूत ज्ञान मिळवणे
४ आपला धोखा पत्करण्याची क्षमता तपासून पाहणे.
५ दीर्घ काळासाठी गुंतवणूक करणे.
६ एक असा स्टॉक ब्रोकर निवडणे जो उकृष्ट सेवा देईल.

0 टिप्पण्या